Teacher Explaining A Physics Concept: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या माध्यमातून नवनवे कन्सेप्ट समोर येत असतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिक्षण देतात, याबाबतचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका फिजिक्स शिक्षकाचा (Physics Teacher) व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत पाहून नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ दीपक प्रभू यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओत (Viral Video) एक शिक्षक हातात दोन ग्लास घेतले आहेत. एक ग्लास छोटा, तर एक ग्लास मोठा आहे. काही वेळानंतर शिक्षक छोटा ग्लास मोठ्या ग्लासमध्ये टाकतो. त्यानंतर त्यात तेल ओततात. काच आणि तेल यांचे अपवर्तनांत समान होतात. यामुळे आतील छोटा ग्लास दिसत नाही. आतापर्यंत हा व्हिडीओ 80,000 हून अधिक लोकांनी पाहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षकाची शिकण्याची पद्धत नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "एक मेहनती शिक्षक आहेत. इंग्रजी बोलून चमकणाऱ्यांपैकी नाही." 



एका युजर्सने लिहिलं आहे की, 'भारतीय शिक्षण प्रणालीत मातृभाषेत शिकवले जात नाही. त्यामुळे लूटमारीला प्रोत्साहन मिळते आणि तेच शिक्षकांचं झालं आहे. फक्त ते वाचा आणि समजावून सांगा. बस इतकंच.' दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, 'खरंच... सोप्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगणे विलक्षण आहे. पाहून आनंद झाला. यामुळेच चांगले विद्यार्थी घडतात.'