रायचूर : सरकारी शाळेच्या शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शाळेतील विद्यार्थीनीच्या आईवर शारीरिक संबध ठेवण्यासाठी त्याने दबाव आणल्याचे सांगितले जात आहे. आरोपी शिक्षक मोहम्मद अजरुद्दीन या शालेत इतर मुलींशीही अश्लिल वागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान या शिक्षकाला शाळेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकच्या रायचूर येथील सिंगापूरा शाळेतील मोहम्मद अजरुद्दीन या शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. या शिक्षकावर विद्यार्थीनींच्या विनयभंगाचा आरोप आहे. या आरोपीने एका विद्यार्थीनीच्या आईवर शारीरिक संबध ठेवण्यासाठी दबाव आणला असून शारीरिक संबधांच्या बदल्यात त्याने विद्यार्थीनींला विना फी ट्युशन आणि सरकारी सुविधा मिळवून देण्याचे आमिष दिले, अशी तक्रार विद्यार्थीनीच्या आईने केली आहे.


पीडित महिलेने पुढे म्हटले की, आरोपीने तिचे नको ते व्हिडीओ बनवले होते. ते व्हिडीओ तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. या सर्व घटनांची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे.