प्रेमासाठी काय पण ! विद्यार्थिनीसोबत लग्नासाठी `ती` झाली `तो`, आधी लिंग बदललं आणि आता
Teacher in love with Student : प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. याचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील ही घटना.
Teacher Student Love Story : देशभरात सध्या एका लव्ह स्टोरीची चर्चा आहे. कारण ही लव्ह स्टोरी एक विद्यार्थिंनी आणि महिला शिक्षिकेची आहे. राजस्थानमधील (Rajasthan) या प्रेमप्रकरणावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. महिला शिक्षिकेने यासाठी लिंग देखील बदलले आहे. महिला शिक्षिका पुरुष झाली आहे आणि आता दोघांन विद्यार्थीनीशी लग्न केले. सोशल मीडियावर या प्रेमकहाणीने खळबळ उडाली आहे.
दोघांनी लग्न केल्यानंतर विद्यार्थिनीने म्हटले की, "माझे नाव कल्पना असून मी मॅडमच्या प्रेमात पडले. मला त्या खूप आवडायच्या. आम्ही प्रथम एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केले. नंतर आमच्या कुटुंबियांना सांगितले. सर्वांनी आम्हाला साथ दिली. मॅडमने लग्नासाठी लिंग बदलले. पण मॅडमने लिंग बदलले नसते, तरीही मी त्यांच्यावर प्रेम केले असते आणि त्यांच्याशी लग्न केले असते.''
लिंग बदल केल्यानंतर शिक्षिका मीरा आता आरव झाला. मीराने सांगितलं की, ती खूप हुशार मुलगी आहे. आमच्या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. लिंग बदलण्याचा विचार मी आधीच केला होता. 2012 मध्ये मी याबाबत एक बातमी वाचली होती. तेव्हा मी याबाबत आणखी माहिती घेत होते. मला YouTube च्या माध्यमातून कळले की, दिल्लीतील एक डॉक्टर लिंग बदलणारी शस्त्रक्रिया करतात. त्यानंतर तिथे जाऊन उपचार केले. हे उपचार 2019 पासून सुरू होते. माझी शेवटची शस्त्रक्रिया 2021 मध्ये झाली. मी मुलगी म्हणून जन्माला आलो, पण मला वाटलं की, मी मुलगी नसून मुलगा आहे. म्हणून मी माझे लिंग बदलले आणि 2 दिवसांपूर्वी माझी विद्यार्थिनी कल्पना हिच्यासोबत लग्न केले."