मुंबई : आज 5 सप्टेंबर देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला शिक्षण देऊन जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचा आजचा दिवस. गूगलने शिक्षकांप्रती डुडल बनवून आजचा दिवस साजरा केला आहे. यावेळी गुगलने अॅनिमेटेड डूडल बनवलं आहे. Google मधील पहिल्या अक्षरातील G ला ग्लोबचा आकार दिला आहे. हा ग्लोब फिरता फिरता थांबतो आणि त्याच्यातून चष्मा येऊन तो शिक्षकासारखा दिसतो. याचे वेगवेगळे बदलताना दिसतात. 


का साजरा केला जातो हा दिवस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून हा 5 सप्टेंबरचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शिक्षक आणि गुरूंच्या प्रती सन्मान व्यक्त केला जातो. पाच सप्टेंबर 1888 मध्ये तामिळनाडूच्या एका छोट्याशा गोव्यात तिरूमनीमधील एका ब्राम्हण परिवारात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. कुणी विचार केला नसेल की ते देशाचे राष्ट्रपती होतील आणि त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाईल. 


1962 मध्ये राधाकृष्णन राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांचा वाढदिवस 'राधाकृष्णन दिवस'म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करा असे सांगितले. मगा हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.