Viral Video : आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. कधी लहान मुलांची फजिती तर कधी डान्सचे व्हिडीओ. नुकतंच असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्या व्हिडीओमध्ये शाळेतील शिक्षकांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेचे शिक्षक तुफान डान्स करताना दिसतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत तुम्ही भन्नाट डान्स पाहिले असतील मात्र शाळा शिक्षकाचा भन्नाट डान्स क्वचितच पाहिला असेल. हा व्हिडीओ आहे शाळेतील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. त्यात एका शिक्षिकेनं डान्सला सुरवात करताच या शिक्षकालाही नाचण्याचा मोह आवरला नाही. 


गाणं सुरु होताच या शिक्षिकांनी बेधुंद डान्स सुरू केला. त्यानंतर त्यांना आवरण्यासाठी स्वतः मुख्याध्यापक सरसावल्या. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शिक्षकांना आवरताना मुख्यध्यापकांनी डोक्यावरच हात मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हास व्हिडिओ नेमका कुठला आहे ते कळू शकलेलं नाही.



तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, पहिल्यांदा एक शिक्षिका डान्स करायला सुरुवात करते. त्या शिक्षिकेला पाहून अजून एक शिक्षकंही ताल धरून नाचू लागतात. हे शिक्षक इतक्या तुफान पद्धतीने नाचले आहेत, की एखाद्या उत्तम डान्सरला देखील ते मागे टाकतील.