मुंबई : न्यू ईअर संदर्भात तेलंगानातील पुजाऱ्यांचा नवा नियम... भक्तांना दिली धमकी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, सीएस रंगराजन नावाच्या पुजाऱ्यांनी भक्तांना धमकी वजा आपला नवा नियम सांगितला आहे. जर त्यांना कुणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर त्याला ते महागात पडणार आहे. कारण पुजारी त्याला कडक शिक्षा देणार आहेत. शिक्षेचे स्वरूप असेल उठ्या - बश्या काढणे.....


काय आहे पुजाऱ्यांचं म्हणणं.... 


1 जानेवारी हे नववर्ष हिंदूत्वाच्या विरूद्ध आहे. तसेच तेलगु संस्कृतीमध्ये नव वर्ष हे उगादिच्या वेळी साजरे केले जाते. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांनी हा सण साजरा करण्याचा सल्ला दिला आहे. 


सोशल मीडियावर होतय व्हायरल 


चिलकूर बालाजी मंदिरातील पुजारी रंगराजन यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हा प्रकार समोर आल्यावर जेव्हा मीडियाने पुजाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर आनंद व्यक्त केला. तसेच आपल्या वक्तव्याची सारवासारव केली. पुजारी रंगराजन यांनी सांगितले की, दरवर्षी नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात भक्त त्यांना नवीन वर्षाबाबत सांगतात. तसेच ते त्यांनी शुभेच्छा ही देतात. तर पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे मंदिर एका शाळेप्रमाणे आहे आणि भक्त विद्यार्थी. तर मी एका शिक्षकाप्रमाणे त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. 


म्हणून मी त्यांना सांगतो की, 1 जानेवारीला नव वर्ष साजरं न करता उगादि हा दिवस साजरा करावा असं मी त्यांना सांगतो. आणि तसं न झाल्यास मी त्यांना शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगणार आहे.