`मी एक इशारा केला तर तुम्हाला...`, जाहीर सभेत ओवेसींची पोलिसांना धमकी; पाहा Video
Akbaruddin Owaisi Threat To Policeman: अकरबरुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरु असतानाच पोलीस अधिकाऱ्याने 10 वाजून गेल्याचं इशाऱ्यानेच मंचावरील नेत्यांना कळवल्यानंतर गोंधळ सुरु झाला.
Akbaruddin Owaisi Threat To Policeman: तेलंगणमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा सुरु आहेत. अशाचत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएमचे नेते अकरबरुद्दीन ओवेसी हे वादात सापडले आहेत. एका भरसभेत वेळेत भाषण संपवण्यासंदर्भात सूचना केल्यानंतर अकरबरुद्दीन ओवेसींनी थेट पोलीस निरिक्षकाला मंचावरुनच धमकावलं आहे. पोलिसांनी वेळेत सभा बंद करण्याची सूचना केल्याने अकरबरुद्दीन ओवेसींनी पोलिसांनाच दम भरला. अकबरुद्दीन ओवेसी तेलंगणातील चंद्रयानगुट्टा येथून निवडणूक लढवत असून त्यानिमित्त ते हैदराबादमधील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगर पोलीस स्टेशनमधील एका निरिक्षकाने त्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली. यामुळे संतापलेल्या एआयएमआयएमच्या नेत्यांनी जाहीर सभेतच पोलिसांना धमकावलं. भरसभेतच ओवेसी बंधूंनी पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकबरुद्दीन ओवेसी नक्की काय म्हणाले?
सभा सुरु असतानाच 10 वाजून गेल्याचं मंचाजवळ असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने घड्याळाकडे बोट दाखवून सूचित केलं. त्यानंतर अकबरुद्दीन ओवेसी भाषण देतादेताच संपापले. चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमकूवत झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी पाच मिनिटे बोलणार आहे. मला थांबवू शकेल असा कोणी मायका लाल जन्माला आलेला नाही असं अकबरुद्दीन ओवेसी मंचावरुन म्हणाले. मी एक इशारा केला तर तुम्हाला इथून पळ काढावा लागेल, असंही ओवेसींनी म्हटलं. त्यानंतर अकबरुद्दीन ओवेसी तावातावात पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने गेल्याचंही पाहायला मिळालं. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या तोंडून कोणती वाक्य बाहेर पडली ते विधान जसच्या तसं पुढील प्रमाणे...
अकबरुद्दीन ओवेसींच्या तोंडची वाक्यं जशीच्या तशी...
इंस्पेक्टर साहब घड़ी है मेरे पास या फिर मैं आपको ये घड़ी दूं, फिर चलिए… चलिए…. चलिए… चलिए… तुम्हें क्या लगता है कि चाकुओं और गोलियों को झेलने के बाद मैं कमजोर हो गया हूं। अभी भी मुझमें बहुत हिम्मत है। छेड़ो मत, बड़े आके ठहरे। मैं पांच मिनट और बोलूंगा। कोई माई का लाल पैदा नहीं हुआ मुझे रोकने के लिए। सही है न… इनको बता दो इशारा कर दिया तो दौडना पड़ेगा। दौड़ाएं…. मैं आप से यही कह रहा हूं… ये ऐसे ही आते हैं हमारे हाथ को कमजोर करने के लिए होशियार रहो… ये जानते हैं कि अकबरुद्दीन से मुकाबला करने वाला कोई नहीं है। तो ये लोग (पुलिस) कैंडिडेट बनकर आ रहे हैं। आ जाओ… देख लेते हैं.. तुम जीतते हो या हम… तो मैं आप से यही कह रहा था कि एक साथ रहो… संगठित रहो… जबाव ताकत है… जवाब दो…।
गुन्हा दाखल तपास सुरु
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार रात्री दहा वाजल्यानंतर जाहीर सभेमधून निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. ध्वनीक्षेपणासंदर्भातील नियमांमुळे हे निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या धाकट्या भावाची बाजू घेतली आहे. पोलिसांनी इशारा दिला तेव्हा 10 वाजून 1 मिनिटं झाला होता. माझ्या भावाला भाषण देण्यपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला असा दावा करत असदुद्दीन ओवेसींनी भावाची बाजू घेतली. या प्रकरणामध्ये ओवेसी बंधूंविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.