रोजच्या छळाला कंटाळून आई-वडिलांनी (parents) आपल्याच मुलाला (Son) संपवण्यासाठी कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाला संपवण्यासाठी त्याच्या पालकांनीच सुपारी दिली होती. तेलंगणा (telangana) पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी सध्या क्षत्रिय रामसिंग आणि राणीबाई या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासह हत्येमध्ये सहभागी असलेल्या पाचपैकी चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे. (telangana parents kill Son after beat up)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


प्रकरण काय होते?


माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांचे सांगितले की, एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापक असलेले रामसिंग आणि त्यांची पत्नीने मिळून यांनी त्यांचा एकुलता एक 26 वर्षांचा मुलगा साई राम याला मारण्यासाठी 8 लाख रुपये दिले होते. तरुणाचा मृतदेह पोलिसांना 19 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतला होता. दारूचे पैसे न दिल्याने राम आई-वडिलांना मारहाण करत असे, असेही पोलिसांचे सांगितले. साई रामला पुनर्वसन केंद्रात देखील पाठवले होते पण त्याचा फायदा झाला नाही, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.


पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या हत्येसाठी दाम्पत्याने राणीबाईचा भाऊ सत्यनारायण यांची मदत घेतली. सत्यनारायणने आर रवी, डी धर्मा, पी नागराजू, डी साई आणि बी रामबाबू यांच्यासोबत मिळून साई रामचा खून केला.


दाम्पत्याने हत्येसाठी आधीच दीड लाख रुपये दिले होते. हत्येच्या तीन दिवसांनंतर साडेसहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 18 ऑक्टोबर रोजी सत्यनारायण आणि रवीने रामला कल्लेपल्ली मंदिरात नेले आणि तेथे इतर आरोपींना भेटवले. पोलिसांनी सांगितले की, 'सर्वांनी दारू प्यायली आणि जेव्हा राम दारूच्या नशेत होता तेव्हा त्यांनी त्याचा दोरीने गळा दाबला. त्यानंतर त्याचा मृतदेह फेकून दिला होता.


असा झाला खुनाचा उलघडा


तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खूनासाठी वापरलेली कार सापडली. हीच गाडी पोलिसांना दाम्पत्यापर्यंत घेऊन गेली.  त्याचवेळी त्यांनी गाडी हरवल्याची तक्रार दाखल न केल्याने पोलिसांचा संशय बळावला. मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पालक 25 ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन गृहात पोहोचले तेव्हा याच गाडीचा वापर झाल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी जेव्हा दोघांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.