Viral Video : तेलंगणातील मेहबूब नगरमध्ये मोठी दुर्घटना टळली. एक स्कूल बस पुराच्या पाण्यात जवळपास अर्धी बुडाली होती. या बसमध्य 20 शाळकरी विद्यार्थी होते. बस पाण्यात अडकताच विद्यार्थी घाबरले आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. भीतीने मुलं रडायला लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी पाण्यात उतरुन विद्यार्थ्यांना बाहेर काढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या थराकक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


मेहबूब नगरच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. 20 मुलांना घेऊन जाणारी बस मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यानच्या सबवेमध्ये अडकली.


बस ड्रायव्हरला पाण्याचा अंदाज आला नाही
बस चालक सकाळी मुलांना शाळेत घेऊन जात होता. सबवे पाण्याने भरला होता. चालकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याने बस पाण्यात नेली. पण काही अंतर पुढे जाताच बस जवळपास अर्धी पाण्यात बुडाली. बसच्या खिडक्यांपर्यंत पुराचं पाणी आलं आणि बसमध्ये शिरलं. यामुळे बसमधली मुलं प्रचंड घाबरली.


सर्व विद्यार्थी सुरक्षित
लोकांच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रॅक्टरच्या साहाय्याने बसही बाहेर काढण्यात आली.