5G India Speed and Launch Date : टेलिकॉम क्षेत्रात 4 जीमुळे (4G) मोठी क्रांती घडली. आता सर्वांना 5 जीचे (5G) वेध लागले आहेत. सध्या 5 जी स्पेक्ट्रमचे लिलाव सुरु आहेत.  जिओ (Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) आणि अडानी (Adani) या मोठ्या कंपन्यां लिलावात सहभाग घेतला आहे. ( telecom sector 5g superfast services in india know 5g launching date jio airtel and vi pm narendra modi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी 5G बाबत महत्तवपूर्ण घोषणा केल्या. त्यानुसार भारतात  5 जी सेवा (5G India Launch) कधीपर्यंत सुरु होणार, त्याचा वेग (5G Speed in India) किती असणार हे आपण जाणून घेऊयात.


देशात इतका असेल 5 जी स्पीड


पंतप्रधान  मोदींनी आपल्या भाषणात तांत्रिक विकासाबाबत अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. पीटीआयनुसार, मोदींनी आपल्या भाषणात 5 जीचा स्पीड किती असेल, हे ही सांगितलं आहे. 4जी च्या तुलनेत 5 जी चा स्पीड हा दहापट इतका असेल, असं मोदींनी म्हटलंय. तसेच 5G लैग फ्री कनेक्टिविटी ऑफर करणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.


भारतात  5G केव्हा लॉन्च? (5G Launch Date In India)


देशात पुढील महिन्यात 5G सेवा लॉन्च करण्यात येऊ शकते. एअरटेलने ऑगस्टमध्ये  5G रोलआऊट करण्याचा दावा केलाय. तर जिओच्या आकाश अंबानींनीही ऑगस्टमध्येच 5G सेवा सुरु होऊ शकते.