रस्ताबांधणीवरुन भारत-चीनमध्ये तणाव वाढला
भारत-चीन दरम्यान सिक्कीम सीमेलगत तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका-ला प्रदेशात रस्ता बांधणीवरुन भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाद झाला होता. चीनच्या घुसखोरीनंतर चीननं आक्रमक पवित्रा घेतला.
नवी दिल्ली : भारत-चीन दरम्यान सिक्कीम सीमेलगत तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका-ला प्रदेशात रस्ता बांधणीवरुन भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाद झाला होता. चीनच्या घुसखोरीनंतर चीननं आक्रमक पवित्रा घेतला.
चीनच्या आक्रमक पवित्र्यानंतर भारतानंही सीमेवर लष्कराची जादा कुमक तैनात केली आहे. मात्र वाढीव सैन्य सीमेवर तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा नाही. असा खुलासा भारतीय लष्कराकडून करण्यात आला आहे.