तणावापूर्ण वातावरणातही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गर्दी
जम्मू कश्मीर राज्यासाठी असलेले विशेष कलम ३७० व ३५ (अ) हटविल्यानंतर इथले वातावरण चिघळेल अशी आशंका व्यक्त होत होती.
नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमधील अनुच्छेद ३७० कलम हटविल्यानंतर त्याठिकाणी तणावाच्या अफवा पसरविल्या जात असताना मात्र शक्तीची देवता माताराणी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मूच्या कटरा येथे कुठलेही भय न बाळगता भक्तांची अलोट गर्दी उसळलेली दिसत आहे. भारत सरकारने जम्मू कश्मीर राज्यासाठी असलेले विशेष कलम ३७० व ३५ (अ) हटविल्यानंतर इथले वातावरण चिघळेल अशी आशंका व्यक्त होत होती.
कश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये कटकारस्थान रचले जात आहे. शिवाय जम्मू कश्मीरमध्ये दगडफेक आणि हिंसाचार उसळल्याच्या अफवा देखील पसरविल्या जात आहे. असे असतानाही देशाच्या विरोधकांचा नापाक दृष्टीकोनास माँ वैष्णोदेवीच्या भक्तांनी जशास तसे उत्तर दिले आहे. कुठलेही भय, दहशत न बाळगता शक्तीच्या देवतेची भक्ती होत आहे. देशभरातून भक्तगण मोठ्या संख्येने माताराणीच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी कटरा येथे दाखल होत आहेत.
विशेष म्हणजे दरदिवशी माताभक्तांची संख्या वाढती आहे, कटरा, जम्मू, शिवखोरी, पटणीटॉप या ठिकाणी देखील पर्यटक वाढले असून शांतता, भयमुक्त आणि जोशपूर्ण वातावरण दिसून येत आहे, सर्व व्यापार सुरळीत आणि जोमाने सुरू आहे.
भक्तगणांकडून जय माता दी च्या नाऱ्यांनी वैष्णोदेवी भवन असलेली पहाडी निनादत असून पाकधार्जिन्यांचे डोळे उघडणारे हे दृश्य आहे. वैष्णोदेवी प्रति अटलईच्छाशक्तीची भक्ती, माताराणीचे तेज, आशीर्वाद, दिव्यशक्ती यामुळेच याठिकाणी शांती नांदत असल्याची भक्तांची भावना आहे.