नवी दिल्ली : देशात आज पुन्हा एकदा 6 राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पण यामध्ये कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. भूकंपाची तिव्रता कमी असल्याने त्यामुळे कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही. पण भारतात लवकरच जोरदार भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्य़वस्थान विभागाच्या तज्ज्ञांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांच्या मते, 8.2 किंवा त्यापेक्षा अधिक तिव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता आहे. हिमालयाच्या परिसरात हा भूकंप येण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये 6.7 (जानेवारी 2016), नेपाळमध्ये 7.3 (मे 2015) आणि सिक्किममध्ये 2011 मध्ये 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. यामुळे भूगर्भामध्ये अनेक मोठे बदल झाले होते. आधीच्या झटक्यांमुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे समस्या अधिक गंभीर झाली आहे.


राष्ट्रीय आपत्ती विभागाने नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर इशारा दिला होता की, डोंगराळ आणि पर्वतीय भागात भूकंपाचा धोका आहे. याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीवर देखील भूकंपाची टांगती तलवार आहे. दिल्ली भूकंपासाठी खूप संवेदनशील मानली जाते.