नवी दिल्ली : दिल्लीमध्ये १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे. श्वानपथकासोबत गाड्यांची तपासणी केली जात आहे. काळ्या रंगाच्या काचा असणाऱ्या गाड्यांवर देखील कारवाईसाठी पोलिसांनी आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ ऑगस्ट रोजी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. दिल्लीच्या सीमा भागामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. सर्व गाड्यांची कसून चौकशी होत आहे, संवेदनशील सीमा भागात पोलीस श्वानपथकाच्या मदतीने तपासणी करत आहेत.


लष्कराच्या गणवेशात दहशतवादी हल्ला करु शकतात. त्यामुळे हे देखील आव्हान सुरक्षारक्षकांपुढे असणार आहे. दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.