नवी दिल्ली : दहशतवाद पसरवण्यासाठी फंडिंग केलं जात असल्याची शंका एनआयएनं व्यक्त केलीय. यामुळेच काश्मीर आणि दिल्लीच्या जवळपास १६ ठिकाणांवर एनआयएनं छापे टाकलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमधल्या काही फुटीरतावादी नेत्यांवर काश्मीरमध्ये सरकारच्या संपत्तीला हानी पोहचवणं, शाळा आणि इतर सरकारी संस्था जाळण्यासारखी हिंसक कामं करणं यासाठी लष्करचा प्रमुख हाफिज सईदकडून पैसे मिळतात, असा आरोप आहे. खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी आणि जवानांवर दगडफेक करण्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय दोघांकडूनही फंडिंग केलं जातं, असा संशय आहे. 


टेरर फंडिंगच्या आरोपाखाली एनआयएनं मंगळवारी दोन जणांना अटक केली होती. कुलगाम भागातील जावेद अहमद भट आणि पुलवामाचा कामरान युसुफ या दोघांना अटक करण्यात आलीय.