राजौरी : जम्मू -काश्मीरमध्ये  (Jammu kashmir)  पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. दहशतवाद्यांनी (Terrorist) राजौरी (Rajouri) येथील भाजप मंडळ अध्यक्षांच्या घरावर ग्रेनेड फेकला आहे. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून त्यांना राजौरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला. (Terrorist attack on BJP leader's house in Jammu and kashmir)


BSF ताफ्याला केले टार्गेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी काल गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगामच्या काझीगुंड परिसरातील मीर बाजारात बीएसएफच्या (BSF) काफिल्यावर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मालपोरा भागातही गोळीबाराचे आवाज ऐकू आले.



चकमकीत सीआरपीएफ जवानासह 3 जखमी


कुलगाम जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्यावर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा कर्मचाऱ्यासह तीन जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना हल्ला झाला, ते म्हणाले, "जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागातील मालपोरा येथे दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर गोळीबार केला."


लष्कराने दहशतवाद्यांना घेरले


पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, सुरुवातीच्या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि नंतर दहशतवाद्यांना घेरण्यात आले. नागरिकांना परिसरातून बाहेर काढल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, दोन्ही बाजूंच्या मधून मधून झालेल्या गोळीबारामध्ये एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गोळी लागून जखमी झालेल्या दोन नागरिकांना अनंतनाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.