मुंबई : मुंबईसह देशातील अनेक बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि दहशतवादी डॉ. जलील अन्सारीला (jalees ansari) अखेर अटक करण्यात आली आहे. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. तो अजमेर जेलमधून  (Ajmer Jail) पॅरोलवर बाहेर आला होता. जलीस अन्सारी कानपूरमधील मशिदीतून बाहेर येत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांना लखनऊला आणण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो फरार झाल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र एटीएस, मुंबई क्राईम ब्रँचसह सर्व सुरक्षा एजेन्सीद्वारे अलर्ट जारी करण्यात आला होता. आज अन्सारीचा पॉरोल संपणार होता. त्यानंतर त्याला अजमेर जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता झाला. त्याच्यावर १९९२ पासून त्याच्यावर सहा बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप आहेत. जलीस अन्सारी याला अजेमर बॉम्बस्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 


मुंबई मालिकेत झालेल्या स्फोटांसाठी जलीस अन्सारी दोषी आहे. जलीस अन्सारी सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीन यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. अन्सारी दहशतवाद्यांना बॉम्ब कसे बनवायचे हे शिकवायचे याचे प्रशिक्षण द्यायचा. अन्सारी बेपत्ता झाल्याबद्दल  सुरक्षा यंत्रणेने सर्तकतेचा इशारा दिला होता. महाराष्ट्र एटीएस, मुंबई गुन्हे शाखा आणि अन्य सुरक्षा संस्थानी शोध घेत त्याला कानपूरमधून अटक करण्यात आली. त्यासाठी अन्सारीच्या शोधासाठी छापेमारी करण्यात आली.


उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह म्हणाले की, जलीस अन्सारी कानपूरमधील मशिदीतून बाहेर येत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांना लखनऊला आणण्यात आले आहे. यूपी पोलिसांची ही मोठी कामगिरी आहे.


दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी यांचा पॅरोल कालावधी शुक्रवारी संपत आहे आणि त्याच्या अगोदरच त्याच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता झाल्याची खबर मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दिली.  तो अजमेर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अन्सारीच्या मुलाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.