जम्मू-काश्मीर : लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपून बसलेला तळ उद्ध्वस्त करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गांदरबलमधल्या नझूर जंगलात, जम्मू काश्मीर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि जेवणाचं सामानही पोलिसांनी जप्त केलं आहे. 


यामध्ये खाण्याचं साहित्य आणि भांड्यांचाही समावेश आहे. यावरुन हे ठिकाण लष्कर ए तोयबाचं लपून राहण्याचं ठिकाण होतं हे उघड झालंय. यापुढेही अशी शोध मोहीम सुरुच ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.