नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेर असल्याचा आरोपाखाली कैदेत ठेवले आहे. याप्रकरणी भारतीय गुप्तचर विभागाने नवी माहिती दिली आहे. कुलभूषण यांचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुल्ला उमर इरानी असे या दहशतवाद्याचे नाव असून तो संगठन जैश-ए-अद्ल या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहे. कुलभूषण यांना इराणच्या चाबहार पोर्ट येथून साधारण ५२ कि.मी. दूर सरबज शहरातून अपहरण करून इराणमधून पाकमध्ये आणले. 'फर्स्ट पोस्ट'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. 


पाक पुरस्कृत संघटना 


 ही संघटना पाकिस्तानच्या सैनिकांच्या जवळची मानली जाते. इराणमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावास कडून या संघटनेला फंड मिळतो असेही म्हटले जाते. जमात-उद-दावा आणि लश्कर-ए-खुराशन हे दोघे मिळून दहशतवाद पसरवतात. 


पाकचा नवा व्हिडिओ


नुकताच पाकिस्तानने कुलभूषण यांचा नवा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये पाक कुलभूषण यांच्यासोबत चांगला व्यवहार करतेय असे जगाला दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. 


(फोटो कर्टसी- फर्स्ट पोस्ट)