जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अभिनेत्रीची हत्या
Terrorists fired upon one Amreen Bhat at her residence : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची गोळ्या घालून हत्या केली आहे.
काश्मीर : Terrorists fired upon one Amreen Bhat at her residence : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. या हल्ल्यात अमरीन यांचा दहा वर्षांचा पुतण्याही गोळी लागून जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अभिनेत्री अमरीन आणि तिच्या दहा वर्षांच्या पुतण्यावर चादूरा येथील अमरीन भट यांच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात ते दोघे जखमी झालेत.
दरम्यान, या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी अमरीन भट यांना मृत घोषित केले. पुतण्यावर उपचार करण्यात येत आहे. पुतण्यालाही हातावर गोळी लागली आहे.