श्रीनगर: एकीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी स्वातंत्र्य दिनला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचे मनसुबे उधळून लावले असताना आता श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. सीआरपीएफच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा हल्ला करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनगरच्या सनातननगर इथे हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. स्वातंत्र्य दिन निमित्तानं देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलिसांची कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, श्रीनगर परिसरात सुरक्षा दल अलर्टवर आहे.



जम्मू-पोलिसांनी जैश ए च्या दहशतवाद्यांसह साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात पोलीस कसून चौकशी करत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट होत मात्र तो उधळून लावण्यात सुरक्षा दल आणि पोलिसांना यश आलं आहे.