अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, गुप्तचर विभागाकडून अलर्ट
श्रीराममंदिर जन्मभूमीपूजनच्या दिवशी आणि 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता
नवी दिल्ली : भारतीय गुप्तचर विभागाने अयोध्या (Ayodhya)येथे होणाऱ्या श्रीराममंदिर जन्मभूमीपूजनच्या दिवशी आणि 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी हल्ल्याची शंका व्यक्त केली आहे. एजेंसी रिसर्च एंड एनालिसिस विंग (R&AW)च्या माहितीनुसार पाकिस्तानचा गुप्तचर विभाग आयएसआय (ISI) ने यंदा भारतात हल्ल्यासाठी जैश आणि लश्करच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये ट्रेनिंग दिली आहे. दहशतवाद्यांना 3 ते 5 गटांमध्ये भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत श्रीराममंदिराच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. याच दिवशी 2019 मध्ये अनुच्छेद 370 हटवण्यात आला होता. त्यामुळे दहशतवादी आणि आयएसआय मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहेत. 10 दिवसानंतर भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. देशातील वेगवेगळ्या भागात हल्ल्याची योजना आयएसआयने रचली आहे.
देशातील महत्त्वाच्या व्यक्ती दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दिल्ली, अयोध्या आणि काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना गुप्तचर विभागाने दिल्या आहेत.