Lucknow Girl : प्रियदर्शनीने कॅब चालकासोबत सेटलमेंट करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल
थप्पड गर्ल प्रियदर्शनी पुन्हा चर्चेत
मुंबई : 30 जुलै रोजी रात्री लखनऊ गर्ल प्रियदर्शनी म्हणजेच Lucknow Girl अगदी रातोरात चर्चेत आली. एका कॅब चालकाला भर रस्त्यात तब्बल 22 वेळा कानाखाली मारणारी प्रयदर्शनीला सगळ्याच स्तरावरून विरोध करण्यात आला. या प्रियदर्शनी आणि कॅब चालकातील 'तो' वाद मिटवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. प्रियदर्शनीने अनेकदा कॅब चालकाला सेटलमेंट करण्याचा सल्ला दिला होता. अखेर तिने सेटलमेंटकरता महत्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रियदर्शनीने नेमकं सेटलमेंटसाठी काय केलं?
रविवारीच रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. या दिवशी थप्पड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रियदर्शनीने कॅब चालक सआदत अलीसोबतचा वाद मिटवण्यासाठी रामबाण उपाय शोधला आहे. प्रियदर्शनीने चक्क कॅब चालकाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी आणली आहे. प्रियदर्शनीने राखी आणि मिठाई आपल्या घरी आणून ठेवली आहे. सआदत प्रियदर्शनीच्या घरी गेला तर ती त्याचं आनंदाने स्वागत करेल. आणि नव्या नात्याला सुरूवात करेल.
भर रस्त्यात प्रियदर्शनीने कॅब चालकावर आरोप केले होते. कॅब चालकावर तिला चिरडण्याचा प्रयत्न करत होता. असा आरोप करत लखनऊ गर्लने तब्बल 22 वेळा चालकाच्या कानाखाली मारली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर तरूणीवर खूप टीका करण्यात आली.
हा व्हिडीओ सोशल मीडिया खूप व्हायरल झाला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. असं असताना देखील प्रियदर्शनीने सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. लखनऊ गर्ल सोशल मीडियावर चर्चेत आहे.