जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा शेतात सापडला मृतदेह, धक्कादायक घटना!
जामीनावर बाहेर आला अन् त्याचाच गेम झाला, ऊसाच्या शेतात....
Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या 23 वर्षीय बलात्काराच्या आरोपीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपीला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचवेळी मृत आरोपी तरुणाच्या घरी शोककळा पसरली आहे. हे प्रकरण खतौली कोतवाली भागातील छछरपूर गावचे आहे, जिथे एक दिवसापूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय सूरजचा मृतदेह गावातीलच ऊसाच्या शेतात सापडला होता. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या.
दीड महिन्यापूर्वी मयत तरुण सूरजला त्याच गावातील सोनू उर्फ आकाश नावाच्या व्यक्तीने पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले होते. यानंतर 20 ऑक्टोबर रोजी मयत तरुण सूरज जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. गावातील सोनू उर्फ आकाश याने गुरुवारी सूरजला फोन करून घरी बोलावले, असा आरोप मृत तरुण सूरजच्या नातेवाईकांनी केला आहे.
यानंतर सुरज पुन्हा घरी न परतल्याने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात नोंदवली असल्याचे नातेवाईकांनी सांगितलं. आता पोलिसांनी मृत तरुणाचा भाऊ सत्येंद्र याच्या तहरीरच्या आधारे सोनू उर्फ आकाश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना खतौलीचे सीओ राकेश कुमार सिंह म्हणाले की, 3 नोव्हेंबर रोजी सतेंद्रचा मुलगा सोमवीर याने खतौली पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ सूरज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर तरुणाचा शोध सुरू असताना गावातीलच मोहनसिंग यांच्या उसाच्या शेतातून त्याचा मृतदेह सापडला.
सूरजच्या छातीवर बंदुकीच्या गोळीच्या खुणा होत्या. मृत तरुणाचा भाऊ सत्येंद्र सैनी सांगतो की, दीड महिन्यापूर्वी गावातील सोनू आणि आकाश या तरुणांनी सुरजला त्याच्या सुनेवर बलात्काराचा आरोप करून तुरुंगात पाठवले होते. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.