मुंबई : Wedding News : लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री 12.30 च्या सुमारास वराच्या आईला जाग आली. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजमेरच्या विजयनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला, ज्याबद्दल ऐकून लोक थक्क झाले. या भागातील रहिवासी ताराचंद मेवाडा यांनी आपल्या मुलाचे लग्न महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुलीसोबत निश्चित केले. मुलीचा फोटो पाहून वडिलांनी लग्नाला होकार दिला. हिंगोलीतील गोरेगाव सेनगाव येथे राहणारी मुलगी आणि तिच्या कुटुंबातील 8 जणांना 20 एप्रिल रोजी बोलावून त्यानंतर 21 एप्रिल रोजी लग्नाची तारीख ठरली आणि लग्नाचा करार करण्यात आला. यासोबतच वधूला तिच्या घरी नेण्यासाठी लग्नाच्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिल्यानंतर वधुला पाठवण्यात आले.


नवरी मध्यरात्री पळून गेली


यानंतर कुटुंबीयांकडून लग्नासाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वधूसाठी सोन्याचे मंगळसूत्र, कानातले आणि अंगठी,  जोडवी आणि इतर ज्यांची किंमत सुमारे 50,000 रुपये होती. हे सर्व दागिने नववधूला देण्यात आले. 22 एप्रिल रोजी वराने वधुला सुमारे 15,000 रुपये किमतीचा मोबाईल दिला होता. 22 एप्रिल रोजी रात्री जेवण करुन कुटुंबीय झोपले असता, रात्रीची संधी पाहून वधूने वराला झोपलेले पाहून दागिने, मोबाईल घेऊन पळ काढला. रात्री 12.30 च्या सुमारास नवऱ्याच्या आईला जाग आली, त्यांनी घराचा दरवाजा उघडा पाहिला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.


या घटनेची माहिती पोलिसांना दिली


या घटनेनंतर वराच्या वडिलांनी विजयनगर पोलीस ठाण्यात नववधूसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बिजयनगरचे ठाणाअधिकारी दिनेश कुमार चौधरी यांनी सांगितले की, पटेल कॉलनी येथील रहिवासी आणि तक्रारदार ताराचंद मेवाडा यांना प्रस्ताव आला. त्यांनी सांगितले की, मी माझ्या ओळखीच्या लोकांशी माझ्या मुलाच्या लग्नाबाबत बोललो होतो. मग त्यानी मला एक मुलगी दाखवली. लग्नाच्या बहाण्याने त्याने माझ्याकडून दोन लाख रुपये उकळले. मुलगी दोन-तीन दिवस येथे राहून रात्री घराबाहेर पडली. माझी दोन लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.