मुंबई : गुजरातच्या पालनपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेहाला स्मशानात नेत असताना मृतदेह अचानकपणे जिवंत झाल्याने उपस्थितांचा पुरता गोंधळ उडाला. डॉक्टरने या युवकाला मृत घोषित केलं होतं. मात्र मृतदेहात अचानकपणे चेतना आली. त्या तरूणाचं नाव नदीम नोगोरी आहे. हा युवक मजूरी करून स्वताचे घर चालवत होता. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसापूर्वी उष्माघातामुळे नदीमला महाजन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. रविवारी अचानकपणे त्याच्या श्वासोच्छ्वास बंद झाला. त्यानंतर डॉक्टरांनी नदीमला मृत घोषीत केले होते. हे वृत्त ऐकून नदीमच्या कुटुंबात घबराहट पसरली. नदीनच्या मृत्यूच्या वृत्ताने संपुर्ण कुटुंब खचून गेलं होतं. नदीमच्या नातेवाईकांना शोकसभेसाठी बोलविण्यात आलं होतं. त्यानंतर नदीमला स्मशानात नेण्याची तयारी केली गेली. नंतर शव स्मशानात नेण्यात आले. शवाला जमिनीत पूरविण्याची तयारी सुरू असतानाच काही लोकांच नदीमवर लक्ष गेले. त्यावेळी नदीम चक्क श्वास घेऊ लागला होता त्यानंतर त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नदीमला दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी नदीमला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र नदीमने परत श्वास घेणं बंद केलं आणि डॉक्टरांनी त्याला परत एकदा नदीमला मृत घोषित केलं त्यानंतर नदीमच्या कुटुंबियांनी महाजन हॉस्पिटलच्या डॉक्टर्सवर आरोप केले. काही तासापूर्वी म्हणजेच सकाळी ८ वाजता नदीमला मृत घोषीत केलं होत मात्र नदीम १२ पर्यत जिंवत होता. यानंतरचं नदीमचा मृत्यू झाला. सध्या हॉस्पिटलच्या ट्रस्ट संचालकांनी या विषयावर काही प्रतिक्रिया दिली नाही.