नवी दिल्ली : साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने ५ हजार ५३८ कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थ मंत्रालयाने अन्न पुरवठा खात्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. या निर्णयामुळे साखरेचे उत्पादन वाढीस लागणार असून मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करण्यात येईल. विशेष म्हणजे साखर निर्यातासाठी साखर कारखानदारांना अनुदान देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८-१९ या वर्षासाठी ५ दशलक्ष म्हणजेच ५० लाख टन साखर निर्यातीवर कारखानदारांना अनुदान देण्यात येणार आहे. १३.८८ रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबाने हे अनुदान देण्यात येईल. देशातील साखरेचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि साखर कारखानदांकडे असलेली १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी जमा करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. 


दरम्यान, आगामी, २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योजकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.