नवी दिल्ली : अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यापूर्वी बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी होते. पण आता पुन्हा एकदा जेफ बेजोस हे अग्रस्थानी आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉनच्या तिसऱ्या क्वार्टरचे निकाल समोर आल्यानंतर, सात अब्ज डॉलर्सच्या शेअर्सच्या किंमतीत घट झाल्यानंतर जेफ बेजोस यांनी पहिलं स्थान गमावलं होतं.


अॅमेझॉनच्या शेयर्सचे दर गुरुवारी सात टक्क्यांनी कमी झाले. ज्यामुळे बेजोस यांची संपत्ती १०३.९ अब्ज डॉलर्स इतकी झाली. 


फोर्ब्सनुसार, अॅमेझॉनचे शेयर एक टक्क्याने घसरून १,७६०.७८ डॉलरवर बंद झाले. त्यानंतर जेफ बेजोस त्यांची संपत्ती १०९.९ अब्ज डॉलर इतकी झाली आणि ते पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले.


  


जेफ बेजोस यांच्याहून केवळ ४.१ अब्ज डॉलर मागे असलेले बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १०५.८ अब्ज डॉलर इतकी आहे. 


अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी गेल्या वर्षी १८ जुलै २०१८ मध्ये श्रीमंतीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्यावेळी त्यांनी संपत्ती १५० अब्ज डॉलरच्या जवळपास पोहचली होती.