मुंबई : जमाना ब्रँडिंगचा आहे. त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या मार्गानं उद्योग व्यवसायाचं ब्रँडिंग करताना पाहायला मिळतो. भोपाळमधील एका फरसाणवाल्यानं मोदी चिवडा बाजारात आणलाय. हा चिवडा खरेदी करण्यासाठी लोकांच्या उड्या पडता आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शिवाय इन्कम टॅक्स चिवडाही या दुकानात मिळतो. या चिवड्यात सुकामेवा टाकण्यात आलाय. त्यामुळं य़ा चिवड्याला इन्कम टॅक्स चिवडा असं नाव दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. 


त्य़ांच्या समर्थकांना ग्राहक बनवण्य़ाची अस्सल व्यावसायिक कल्पना अभिशिव यांची आहे. मोदींच्या जॅकेटला बाजारात मोठी मागणी आहे. त्यांच्या या कोटची जादू अजूनही ओसरलेली नाही. मोदी साड्यांनीही मोठा भाव खाल्ला होता. आता दिवाळीचा फराळातला चिवडाही मोदींच्या ब्रँडनेमनं विकला जाऊ लागला आहे.