मुंबई : जर तुमच्याकडे Honda कंपनीची बाईक आहे, तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जपानच्या या ऑटोमोबाईल कंपनीने होंडाबाईक मालकांना रिकॉल केला आहे. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास होंडाच्या काही बाईक्समध्ये फॉल्ट असल्याचं निदान  कंपनीला झालं आहे. त्यामुळे कंपनीने बाईक मालकांना 2019 नोव्हेंबर-जानेवारी 2021 या कालावधी दरम्यान निर्मिती केलेल्या बाईक्सची विक्री केली गेली आहे, अशा बाईक्स मालकांना फोन करुन गाड्या परत मागवून घेतल्या आहे. यामध्ये Honda Activa 5G/6G, हॉर्नेट 2.0, सीबी शाइन, एक्स ब्लेड यासारख्या कॉम्प्युटर मॉडेलचा समावेश आहे. (The company is in contact with vehicle owners as there is an error in 6 bikes including Honda Activa)
     
कंपनीने याशिवाय यादरम्यान ज्या वाहनांमध्ये रिफ्लेरक्टर बदलण्यात आले आहे, त्या मालकांनाही रिकॉल केला आहे. या वाहनांमध्ये अल्प समस्या आहेत. वाहन मालकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. रिफ्लेक्टर चुकीच्या जागी लावल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे रिकॉल करण्यात आला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाडी खराब आहे की नाही, कसं समजेल?


याबाबत जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनाचा 17 अंकी व्हीकल आयडेंटीफीकेशन नंबर (VIN) टाकावा लागेल. यानंतर तुमचे वाहन प्रभावित आहे की नाही, याबाबतची माहिती तुम्हाला मिळेल. 


एसएमएस, मेल आणि कॉलद्वारे वाहनमालकांशी संपर्क


जर तुम्हाला वाहनाच्या रिकॉलचा भाग असाल, तर तुम्ही जवळच्या अधिकृत डीलर/ सर्व्हिस सेंटर निवडू शकता. यानंतर तुम्हाला डीलरशीपकडून एक ठराविक वेळ दिला जाईल. 


तसेच कंपनीने डीलर्सना वाहनमालकांना इमेल, मेसेजद्वारे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे वाहनमालकांना वेळेतच आपल्या वाहनाची तपासणी करुन घेता येईल. तसेच वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही जवळच्या डीलरकडे जाऊन वाहनाबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकता.  


संबंधित बातम्या :


Petrol Diesel Price : बापरे... 'या' शहरात पेट्रोल नाही तर डिझेलने केली शंभरी पार