खाद्यपदार्थांच्या सध्याच्या पॅकिंगवर लवकरच बंदी !
आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ नये, म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे.
मुंबई: सरकार लवकरच खाद्यपदार्थ पॅकिंगच्या व्यवस्थेत बदल करणार आहे. आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ नये, म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी नवीन नियम अंमलात येणार आहेत. या आठवड्यात एफएसएसएआय (fssai) या संदर्भात अधिसूचना जारी करू शकते.
नवीन नियम लागू झाल्यानंतर खाद्यपदार्थांचे पॅकिंग पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांचे पॅकिंग करण्यासाठी अॅल्यूमिनिअम फॉईल आणि प्लॅस्टिकचा वापर केला जातो. या पद्धतीने पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतात. खनिजापासून तयार केलेले खाद्यपदार्थ पॅकिंगचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे. तसेच पुनर्निर्मिती केलेल्या प्लास्टिकचाही वापर करण्यात येणार नाही. भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) खाद्यपदार्थ आवरणाचे नियम होते. आता एफएसएसआयचे नियम अनिवार्य होणार आहेत.
आरोग्याची काळजी घेणार एफएसएसएआय
नवीन नियमानुसार, खाद्यपदार्थ पॅकिंगवर स्पष्टपणे खनिजाचे प्रमाण दाखवले जाणार आहे. जे आरोग्यासाठी धोकादायक असेल अशा पॅकिंगचा वापर टाळला जाईल. नवीन नियमानुसार खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये मल्टिलेअरचा वापर केला जाईल. त्यामुळे खाद्यपदार्थांचा संपर्क थेट पॅकिंगशी होणार नाही. तसेच प्रिंटिंग शाईवर देखील लक्ष दिले जाणार आहे. वर्तमानपत्रात किंवा कागदामधून काहीही पॅकिंग करणे चुकीचे आहे
नवीन नियमात स्वस्त आणि खराब गुणवत्तेच्या उत्पादनांचा वापर पॅकिंगमध्ये केला जाणार नाही. शुद्ध पाण्याच्या बाटल्या पारदर्शक असणे गरजेचे आहे. एका अंदाजानुसार, २०२०पर्यंत भारताची खाद्य बाजारपेठ १८ अब्ज डॉलर्सची होईल. केवळ एवढेच नाही तर एफएसएसएआयचा विश्वास आहे की, खाद्यपदार्थांचे नुकसान टळेल.