सोने खरेदीदारांसाठी खुशखबर... सोन्याच्या भावात लक्षणीय बदल
गेल्या तीन दिवसांत सोन्यात 1000 रुपयांहून जास्त वाढ झालेली पाहायला मिळाली होती.
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्यात 1000 रुपयांहून जास्त वाढ झालेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यात घसरण पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात ऑगस्टमध्ये delivery gold च्या सौद्याचा भाव 260 रुपयांच्या घसरणीसह 51166 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता. ऑक्टोबरमध्ये delivery gold च्या सौद्याचा भाव 193 रुपयांनी घसरून 51433 पातळीवर तर डिसेंबरमध्ये delivery gold च्या सौद्याचा भाव 205 रुपयांनी घसरून 51680 रुपयांवर close झाला.
चार दिवसांच्या तेजीनंतर आज चांदीच्या दरातही घसरण होत आहे. MCX वर सप्टेंबरमध्ये delivery sliver च्या सौद्याचा भाव 199 रुपयांनी घसरून 58171 रुपये प्रति किलोवर होता. डिसेंबरमध्ये delivery sliver च्या सौद्याचा भाव 186 रुपयांच्या घसरणीसह 59250 रुपये प्रति किलोवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1781 डॉलर per ounce या पातळीवर तर चांदीही $20.20 per ounce पातळीवर आहेत.
24 कॅरेट सोन्याची किंमत, पाहा काय आहे?
24 कॅरेट सोन्याचा भाव आज 5141 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 5017 रुपये, 20 कॅरेटची किंमत 4575 रुपये, 18 कॅरेटची किंमत 4164 रुपये आणि 14 कॅरेटची किंमत 3316 रुपये प्रति ग्रॅम आहे.
999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51405 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. 995 शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 51999 रुपये, 916 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47087 रुपये प्रति दहा ग्रॅम, 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 38554 रुपये प्रति दहा ग्रॅम, 585 शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 30072 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 57912 रुपये प्रति किलो आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत एवढी का वाढली होती?
गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात MCX वर सोन्यामध्ये 1.54 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि हीच किंमत 51426 रुपये प्रति दहा ग्रॅमवर close झाला. गेल्या आठवड्यात ही किंमत 50644 वर बंद close झाला. अशाप्रकारे गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 782 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2.26 टक्क्यांच्या वाढीसोबत $1765 per ounce वर close झाला.