अमृतसर : अमृतसरमध्ये वाघा-अटारी सीमेवर पुन्हा एकदा भारताने सर्वात उंच ध्वज फडकवला आहे. 3 महिन्या नंतर 360 फूट उंच स्तंभावर पुन्हा तिरंगा फडकावण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी ध्वज पुन्हा पुन्हा फाटत होता. त्यामुळे काही काळ तो फडकावण्यात आला नव्हता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवा ध्वज फडकावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी 5 मे रोजी या ध्वज स्तंभाचं उद्घाटन केलं होतं. त्याची लांबी 110 मीटर (360 फूट), रुंदी 24 मीटर आणि वजन 55 टन आहे. 110 मीटर लांब या ध्वज स्तंभाने रांचीमध्ये बनलेला 91.44 मीटर (300 फूट) उंच स्तंभाला मागे टाकलं आहे. हा देशातील सर्वात उंच ध्वज स्तंभ मानला जातो.


सीमेपासून केवळ 150 मीटर अंतरावर हा ध्वज स्तंभ आहे. ध्वज स्तंभ सूर्योदय वेळी बीटिंग रिट्रीट पाहण्यासाठी आलेल्या हजारो पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. त्यानंतर इस्लामाबादने सीमेमध्ये 400 फूट उंच पाकिस्तानी झेडा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने जर तसे केले तर तो जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल.