`हा` आहे भारताचा शेवटचा रस्ता...आकाशातून दिसतो अद्भूत नजारा...पाहा Video
भारताचा शेवटचा रस्ता कुठे आहे आणि तो कसा दिसतो?
Video Viral: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताला सोने की चिड़िया असं संबोधलं जातं. भारतातील अनेक मनमोहक अशी ठिकाणं, प्रसिद्ध मंदिर आणि निसर्ग विदेशी पर्यटकांनी आकर्षित करतात. प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे. अनेकांना भारताविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. लहान मुलं पण आपल्याला अनेक भन्नाट प्रश्न विचारतात. भारतातील रेल्वेचं शेवटचं स्टेशन कुठलं, शेवटचं शहर कुठलं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. रस्त्याने जात असताना आपण कधी असा विचार केला आहे का? की, हा रस्ता नक्की संपतो कुठे? भारताचा शेवटचा रस्ता कुठे आहे आणि तो कसा दिसतो? तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.
हा आहे भारताचा शेवटचा रस्ता
भारताचा शेवटचा रस्ता हा तामिळनाडूमधील एक निर्जव गाव धनुषकोडी इथून जातो. हे गाव भारत आणि श्रीलंका यांच्यामधील एकमेव स्थलीय सीमवर आहे. हे गाव वाळूच्या ढिगाऱ्यावर आहे. तर हे गाव भारताची शेवटची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि इथेच भारताचा शेवटचा रस्ता जातो.
सोशल मीडियावर या रस्ताच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा रस्ता पाहून एकदम अद्भूत वाटतं. आकाशातून हा रस्ता पाहिल्यावर असं जाणवतं की, हा रस्ता नसून एक विशाल शिवलिंग आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 3 लाख 46 हजारांपेक्षा जास्त वेळा बघण्यात आला आहे. तर हजारो यूजर्सने व्हिडीओ लाइक केला आहे. भारताचा शेवटचा रस्ता अतिशय मनमोहक आणि सुंदर आहे. तुम्ही कधी तामिळनाडूला गेलात तर प्रत्यक्षात नक्की या ठिकाणी जाऊन या.