VIDEO : एकीकडे मृत्यूची दहशत दुसरीकडे चिमुकल्यांचं प्रेम जिंकतंय प्रत्येकाचं मन
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने थैमान घातलं आहे. यामधून भारतीय वायु दलाचं विमानाने 168 प्रवासी आज अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झाले आहेत. या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश होता. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे. गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर हे विमान 168 प्रवाशांसह लँड झालं. दरम्यान यावेळचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने थैमान घातलं आहे. यामधून भारतीय वायु दलाचं विमानाने 168 प्रवासी आज अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झाले आहेत. या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश होता. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे. गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर हे विमान 168 प्रवाशांसह लँड झालं. दरम्यान यावेळचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडियोमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन विमानतळावर बसलेली दिसत आहे. त्यावेळी या चिमुकल्याची बहिण या बाळाचे मुके घेताना दिसतेय. मुख्य म्हणजे या बाळाची पापी घेतल्यानंतर ती त्या बाळाला देखील स्वतःची पापी घेण्यास सांगते.
अशा बिकट परिस्थितीतही या चिमुरड्यांचं एकमेकांवरील प्रेम आणि खेळ पाहून पाहण्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलंतय. अवघ्या क्षणार्धात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मागील 24 तासात भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 390 भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलंय. असं असलं तरी अद्यापही अनेक भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत.