लग्नाच्या स्टेजवरच प्रियकराने मुलीला मिठी मारली आणि...; नवरा बघतच बसला
वधू-वर स्टेजवर विधी करत असताना वधूचा एक वेडा प्रियकर स्टेजवर चढला
नखनऊ : एक व्हिडीयो जो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्हाला प्रश्न पडेल की हसावं की आश्चर्यचकित व्हावं हे समजणार नाही. असाच एक व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून व्हायरल होतोय. जिल्ह्यातील हरपूर बुधात पोलीस स्टेशन परिसरात लग्नादरम्यान अशी घटना घडली, जी कोणत्याही मुलीला अनुभवायला आवडणार नाही.
वधू-वर स्टेजवर विधी करत असताना वधूचा एक वेडा प्रियकर स्टेजवर चढला आणि जबरदस्तीने तिच्यो डोक्यात कूंकु भरलं. हा प्रकार पाहून लग्नाच आलेले लोकं अवाक् झालेच, सोबतच घरातील सदस्य आणि नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या.
या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं आणि मुलीच्या कुटुंबाने तात्काळ 112 वर फोन करून तक्रार केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता प्रकरण मिटलं.
यासाठी गावातील प्रमुख, वडीलधारी मंडळी आणि जाणकारांची मदत घेण्यात आली. यानंतर वरासह वधूला निरोप देण्यात आला. मात्र, वधूच्या प्रियकराचा हे कृत्य संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला.
प्रियकर गावाबाहेर गेला असताना मुलीचं लग्न ठरवलं
हरपूर बुधात गावातील एका तरुणाला ही मुलगी आवडायची. पण, काही दिवसांसाठी तो गावाबाहेर गेल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचं लग्न ठरवलं. मुलीचं लग्न 1 डिसेंबरला होते. हा प्रकार प्रियकराला समजल्यानंतर तो 28 नोव्हेंबरलाच गावी परतला.
स्टेजवर गोंधळ सुरू झाला
आशिक आपल्या लग्नाला पोहोचला आणि हार घालण्याच्या विधीमध्येच स्टेजवर चढला. एवढंच नाही तर बेधडकपणे त्याने खिशातून कुंकू काढून वधूच्या डोक्यात जबरदस्तीने भरलं. यानंतर त्याने वधूला मिठी मारली. हा सर्व प्रकार घरच्यांना पहावला गेला नाही आणि त्याला स्टेजवरून खाली उतरवलं.
पोलीस आल्यानंतर प्रियकर गेला घरी
पोलीस येताच प्रेमाचं भूत दूर झाले आणि तो त्याच्या घरी गेला. यानंतर मुलांच्या कुटुंबियांनी काही प्रमाणात वाद केला. हा वाद मिटवण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांसह गावातील इतर लोकांनीही मदत केली. अखेर मुलाच्या कुटुंबियांनी होकार दिला आणि सर्व विधी पूर्ण करून वधू-वरांना निरोप देण्यात आला.