भारतात बनलं सर्वात शक्तिशाली औषधी मशरूम; किंमत ऐकून डोळे विस्फारतील
गुजरातमधील वैज्ञानिकांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांनी जगातील सर्वात महागडे मशरूम उगवले आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील वैज्ञानिकांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांनी जगातील सर्वात महागडे मशरूम उगवले आहे. Cordyceps Militaris नावाच्या या मशरूममध्ये ऍंटी ऑक्सिडेंट,ऍंटी डायबिटिक, सुज प्रतिरोधक, कॅन्सर प्रतिरोधक, मलेरिया प्रतिरोधक, ऍन्टी वायरल गुण आहेत.
आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मशरूम शरीरातील ट्यूमरचा आकार कमी करण्यास मदत करतो.
दीड लाखाचं मशरूम
गुजरातमधील वैज्ञानिकांनी मशरूम उगवले आहे. तेही खुप महागडे! एक किलो मशरूमची किंमत दीड लाख रुपये आहे. कच्छच्या गुजरात इंस्टिट्युट ऑफ डिजर्ट इकोलॉजीच्या वैज्ञानिकांनी 90 दिवसांच्या आत नियंत्रित वातावरणात हे मशरूम उगवले आहे. या मशरूमच्या प्रजातीचा वापर चीन आणि तिब्बेटमध्ये प्राकृतिक औषधं म्हणून पुरातन काळापासून होत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार संस्थेचे डायरेक्टर वी. विजयकुमार यांनी म्हटले की, 'मशरूमची Cordyceps Militaris ही प्रजाती हिमालयातील सोनं समजली जाते. ज्याचं सेवन करण्याने शरीराला फायदा होतो. तसेच अनेक आजारांवर गुणकारी आहे.'
कॅसरच्या परिणामकतेवर संशोधन
संस्थानने या मशरूमच्या ऍंटी ट्यूमरच्या बाबतीतही संशोधन केले आहे. मशरूम वापराने शरीरातील ट्यूमर रोखता येतो. जर ट्यूमर झालेलाच असेल तर त्याला कमी करण्यास मदत होते. संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी याची लोकांवर चाचणी करण्यासाठी नियामक मंजूरी मागितली आहे.