मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हा फोटो दिल्लीतील कार आणि बाईकवर या हनुमानाचा फोटो दिसत आहे. अनेक कारच्या काचांवर हा फोटो चिटकवला जातो. एक प्रकरचा ट्रेंड या हनुमानाने उभा केला आहे. या फोटोंत नेमकं असं काय आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळेला हा फोटो काहींना यामध्ये धार्मिक बाब वाटते. पण हा पोस्टर अनेक स्वरूपात चर्चेत आहे. या फोटोची कुतूहलता दिवसेंदिवस वाढत आहे. या फोटोत हनुमान रागाच्या मुद्रेत दिसत आहे. त्यामुळे याला 'अँग्री हनुमान' असं म्हणतात. 


या व्यक्तीने बनला 'अँग्री हनुमान' 


केरळच्या कासरागोड जिल्ह्यात कुंबले गावांत राहणारा 25 वर्षीय ग्राफिक डिझायनर करण आचार्यने हा व्हिडिओ तयार केला आहे. हनुमानाची एक वेगळी इमेज बनवण्याचं श्रेय करण आचार्यला जातं. त्याने तीन वर्षापूर्वी म्हणजे 2015 मध्ये ही इमेज तयार केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार गावातील यूथ क्लबमधील मुलांना गणेश चतुर्थीमध्ये मुलांना काही तरी वेगळी इमेज हवी होती. म्हणून हा फोटो तयार करण्यात आला.  


कोण आहे हा मुलगा ? 


मंगलौरमध्ये जॉब करणारा आचार्यने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांनी जबरदस्ती केल्यामुळे मी हा फोटो तयार केला. हा फोटो अगदी रात्री 12 वाजता तयार केला आहे. फक्त चेहऱ्याचा फोटो तयार करून हा फोटो मित्रांना पाठवला. त्यानंतर त्याने वेक्टर स्टाइल हनुमानच शरीर तयार करण्याच काम केलं. मात्र तोपर्यंत हा फोटो फक्त चेहऱ्याच्या रुपात व्हायरल झालं.