भारतातील एकमेव शहर जिथे आहे 11 विद्यापीठ; त्याला म्हटलं जातं भारताचं प्रवेशद्वार
महाराष्ट्रात पुण्याला शिक्षणाच माहेर घर म्हटलं जातं. पण भारतातील एकमेव शहर आहे, जिथे 11 विद्यापीठं आहेत. या शहरात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कायम गर्दी असते.
भारतातील प्रत्येक शहराची स्वत:ची संस्कृती, वारसा आणि परंपरा आहे. प्रत्येक शहराने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. भारतातील प्रत्येक शहराची आपली अशी वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे परदेशी पर्यटक भारताकडे कायम आकर्षित होतात. भारतातील काही शहरं ही खास करुन धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही सुंदर निळशार समुद्रकिनाऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. विविधतेने नटलेले भारत निसर्ग सौंदर्याबाबत प्रत्येक ऋतुनुसार पर्यटकांना आकर्षित करतं. संस्कृती, परंपरा, प्राचीन वारसा आणि शिक्षणासाठीही भारत प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पुणे शहर हे शिक्षणाचे माहरेघर म्हटलं जातं. पण तुम्हाला भारतात असंही शहर आहे, जिथे 11 विद्यापीठं आहेत. हे भारतातील एकमेव विद्यापीठ शहर आहे जिथे एक नाही दोन नाह तब्बल 11 विद्यापीठे आहेत.
हे शहर कुठले आहे, तुम्हाला माहितीये का? साधारणपणे असे प्रश्न स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले जातात. याशिवाय सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील शिक्षणाचे माहरेघर कुठे आहे.
या शहराचे नाव कोलकाता असून जे पश्चिम बंगालची राजधानी आहे. हे भारतातील दुसरं सर्वात मोठे शहर आहे, ज्याला आनंदाचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं. इथली संस्कृती इतर शहरांपेक्षा वेगळी बनवते. इथलं जेवण, कपडे, पोशाख सगळंच वेगळं आहे. येथील स्थानिक भाषा बंगाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कोलकाता हे पूर्व भारताचे प्रवेशद्वार देखील मानलं जातं, जे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या शहरात जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था आणि पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, NIPER कोलकाता, पश्चिम बंगाल पशु आणि मत्स्यविद्या विद्यापीठ, मौलाना अब्दुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठ, राष्ट्रीय विद्यापीठ अशी एकूण 11 विद्यापीठे आहेत. न्यायिक विज्ञान, रवींद्र भारती विद्यापीठ, भारतीय विदेशी व्यापार संस्था आणि शिक्षक विद्यापीठदेखील आहेत.
सर्वोत्तम करिअर पर्याय!
त्यामुळे याला ज्ञानाचा बुरुज असेही म्हणतात. येथे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही या उच्चस्तरीय विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. तुम्हीही अभ्यासासाठी चांगल्या विद्यापीठाच्या शोधात असाल, तर तुम्ही कोलकाता येथील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकता. येथून तुम्हाला करिअरचा उत्तम पर्यायही मिळेल. हे शहर इतर शहरांच्या तुलनेत खूपच स्वस्त मानलं जातं. शिवाय येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.