मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर करकपात करुन नागरिकांना दिलासा दिला असला तरी दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलचे दर ३१ पैशांनी महाग झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८७.२९ पैसे आहे तर प्रतिलिटर डिझेलचा दर ७७.०६ पैसे आहे.


जुन्या पंपांवर दोन आकडेच 


 बहुसंख्य पेट्रोल पंपाना अपग्रेड करण्याची गरज नाहीयं. पण जुन्या पेट्रोल पंपावर केवळ दोन आकड्यातल्याच किंमती दिसताहेत.


येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किंमतीत आणखी 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेंसर्स वाल्या पंपांना अडचण होऊ शकते. 


पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.


विमान प्रवासही महाग 


 विमानाच्या इंधनाचे दरही वाढलेत. आता विमानाचं इंधन 2  हजार 650 रुपये प्रतिकिलो लिटरला विकलं जाणार आहे.


हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.