या रेड्यांची किंमत ऐकून व्हाल हैराण, मर्सिडीज, फरारीपेक्षाही जास्त
एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. मात्र, मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. एक कोटी, दोन कोटी एव्हढी किंमत तुम्हाला वाटेल मात्र, त्याही पेक्षा जास्त आहे. आलिशान गाड्या मर्सिडीज, फरारीपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. बसला ना तुम्हाला धक्का.
चंदीगड : एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. मात्र, मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. एक कोटी, दोन कोटी एव्हढी किंमत तुम्हाला वाटेल मात्र, त्याही पेक्षा जास्त आहे. आलिशान गाड्या मर्सिडीज, फरारीपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. बसला ना तुम्हाला धक्का.
हरियाणात मुर्रा जातीचे रेडेही अनेक स्पर्धा जिंकून देत आहेत. या मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. मुर्रा म्हशीची किंमतही एक कोटी रुपयांच्या आसपास असते. दरम्यान, सोनीपत जिल्ह्याच्या गोहानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पशु मेळा आणि बाजारात मुर्राह जातीच्या रेडे आणि म्हशींची किंमत ऐकून लोकांना धक्का बसला.
सव्वा नऊ कोटींचा युवराज रेडा ठरलाय आकर्षणाचा विषय
कैथल जिल्ह्यातील बुढ्ढा गावातील जनावर मेळ्यात 'सुल्तान' नावाचा रेडा आणला होता. ज्याची किंमत होती १२ कोटी रुपये होती. सुल्तानचे वजन १७० क्विंटल आहे. तो देशातील सर्वत उंच रेडा म्हणून ओळखला जातो. नऊ वर्षांचा सुल्तान नॅशनल चॅम्पियन आहे. याच्या खाण्यापिण्याचा रोजचा खर्च साडेतीन हजार रुपये आहे.
सात कोटींचा रेडा, ५० लाखांचे वार्षिक उत्पन्न
त्याचबरोबर भिवानी जिल्ह्यातील कुंगड गावातील दुसऱ्या एका रेड्याची किंमत आहे ११ कोटी रुपये. त्याचं नाव 'अर्जुन' आहे. तो आठ वर्षांचा आहे. त्याचा खाण्यापिण्याचा रोजचा खर्च आहे साडेतीन हजार रुपये इतका आहे.
या रेड्यांच्या स्पर्मला अधिक मागणी आहे. त्यांचे स्पर्म लाखो रूपयांना विकले जातात. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचे मालक हजारो रुपये खर्च करीत आहेत. त्यांची चांगली बडदास्त ठेवतात.