'या' देशातील प्रत्येक व्यक्ती महिन्याला कमावते 1 लाख रुपये; सर्वजण मोठमोठ्या जमिनींचे मालक; प्रत्येकजण राजाप्रमाणे जगतो आयुष्य

Kazakhstan Population: श्रीमंत मुस्लीम देशांचा उल्लेख होतो तेव्हा सौदी अरबचा उल्लेख केला जातो. पण मध्य आशियातील श्रीमंत देशांमध्ये कझाकिस्तानचाही समावेश आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीची कमाई 1 लाख रुपये आहे आणि ते जमिनींचे मालकही आहेत.     

| Nov 13, 2024, 21:20 PM IST

Kazakhstan Population: श्रीमंत मुस्लीम देशांचा उल्लेख होतो तेव्हा सौदी अरबचा उल्लेख केला जातो. पण मध्य आशियातील श्रीमंत देशांमध्ये कझाकिस्तानचाही समावेश आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीची कमाई 1 लाख रुपये आहे आणि ते जमिनींचे मालकही आहेत. 

 

1/8

Kazakhstan Rich People: मुस्लिम देश मग तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, सोमालिया, समन असो अशा गरीब देशांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. श्रीमंत मुस्लिम देशांबद्दल बोलायचं गेल्यास सौदी अरेबिया आणि कुवेतची नावं समोर येतात. याच यादीतील एक नाव कझाकिस्तान आहे.  

2/8

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आणि अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या या देशावर निसर्गाचा आशीर्वाद आहे. त्यात जीवाश्म इंधन आणि युरेनियम सारख्या इतर खनिजे आणि धातूंचे महत्त्वपूर्ण साठे आहेत, ज्यापैकी ते जगातील सर्वात मोठे उत्पादक आहेत.   

3/8

याशिवाय कृषी उत्पादनं, कच्चा माल, रासायनिक उत्पादनं आणि त्यापासून तयार होणारा माल येथून निर्यात केला जातो.  

4/8

येथील प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न 14 हजार 569 अमेरिकन डॉलर आहे. जे भारतीय रुपयात 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच येथील प्रत्येक व्यक्ती दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतो.   

5/8

कझाकस्तानचं क्षेत्रफळ जवळपास भारताइतकं आहे. या देशाचे क्षेत्रफळ 26.99 लाख चौरस किमी आहे. तर भारताचे क्षेत्रफळ 32.87 लाख चौरस किमी आहे. म्हणजे ते फक्त 5.5 लाख चौरस किमीने लहान आहेत. पण त्याची लोकसंख्या भारताच्या तुलनेत नगण्य आहे.  

6/8

कझाकिस्तानची लोकसंख्या फक्त 2 कोटी आहे. म्हणजेच, भारतात प्रति चौरस किमी 488 लोक आहेत, तर कझाकिस्तानमध्ये प्रति चौरस किमी फक्त 8 लोक आहेत. यामुळेच प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला जमिनीचा मोठा भाग आहे. साधारणपणे, येथील बहुतेक लोक श्रीमंत आहेत आणि आलिशान जीवन जगतात.  

7/8

निसर्गाने या देशाला नद्या, पर्वत, मैदाने,, तेल आणि वायूचे साठे या सर्व गोष्टींचे वरदान दिलं आहे. फक्त येथे समुद्र किनारा नाही.   

8/8

तसंच येथील 75 टक्के जमीन शेतीयोग्य आहे. या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक माणूस हा जमीनदार आहे. मात्र, येथील सरकार शेतकरी आणि कंपन्यांना शेतीसाठी भाडेतत्त्वावर जमीन देते. जेणेकरून कोणीही आपली जमीन परकीयांना विकू शकणार नाही.