Unnao School Principal Viral Video: आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. असाच उत्तम प्रदेशाच्या एका शाळेतील व्हिडीओ सध्या व्हायरल होतायत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बिघापूर विकासखंडच्या दादामाऊ या प्राथमिक शाळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षण शिकवण्याऐवजी फेशियल करताना दिसतायत.  


प्रिन्सिपल फेशियल करतानाचा व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाळेतील प्रिन्सिपल संगीता सिंग शिकवण्याऐवजी 'फेशियल' करताना दिसल्या. एवढेच नाही तर शिक्षिकेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये. याशिवाय तिच्या हाताला चावाही घेतल्याचं पहायला मिळालं. यामुळे त्या शिक्षिकेला रक्तस्त्राव झाला. 


रक्तबंबाळ हात झालेल्या स्थितीत सहाय्यक शिक्षकाने मुख्याध्यापकाच्या विरोधात बिघापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी संबंधित शिक्षिकेने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी तिचा जीव वाचवला. याप्रकरणी जिल्हा प्राथमिक कार्यालय किंवा बीएसएकडून अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.


नेमकं काय आहे प्रकरण?


मुलांना वर्गात शिकवण्याऐवजी मुख्याध्यापक मुलांना 'फेशियल' करत होती. यावेळी सहाय्यक शिक्षिका अनाम खानने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. यामुळे संतापलेल्या संगीता सिंगने अनाम खानला मारहाण केली आणि तिच्या हाताचा चावा घेतला. याशिवाय शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली. अनम खानने संगीता सिंगच्या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



पोलिसांकडून तपास सुरु


या संदर्भात उन्नाव पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिघापूर पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.