रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन योजनेअंतर्गत नवीन कार्ड छापले जाणार असल्याचं सांगून लाखो रूपये उकळण्याचे समोर आले आहे. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली पोलिसांकडे प्रकरण दिले. त्यातून मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी प्रत्युश कुमार राणा आणि विकास कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तिघांचा शोध सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसे फसवले ?
या योजने अंतर्गत नवीन कार्ड छापण्याचे कंत्राट दिले जाणार असल्याचं सांगण्यात येते. त्या संदर्भातचे मंत्र्यांच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार केली. रांची येथील कंपनीला हे कंत्राट दिल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार कंत्राट देण्यासाठी भगवत वायाळयांच्याकडून १० लाख रूपये घेतले. तसेच उर्वरित पैसे घेण्यासाठी वायाळ यांना दिल्लीत बोलविले.


सापळा कसा रचला ?
वायाळ यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दानवे यांनी दिल्ली पोलिस उपायुक्तांना फोन करून तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर कॅनॉट प्लेस येथील एका हॉटेलात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच अशा प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.


काय आहे वन नेशन वन रेशन योजना
मोदी सरकारने वन नेशन, वन रेशनर इलेक्ट्रॉनिक पोर्टबिलिटी योजना सुरू केलीय. महाराष्ट्र गुजरात, आंध्र तेलंगाना या राज्यांमध्ये या योजनेच्या परीक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. जानेवारी पासून २० राज्य जोडली जाणार आहे. आपल्या गावात एकाच दुकानात रेशन मिळायचे पण आता इतर राज्यात लाभधारक गेला तरी त्याला रेशन मिळते. यालाच वन नेशन वन रेशन म्हणतात.