LPG Cylinder Latest Price: देशात आज पुन्हा एकदा गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. तेल कंपन्यांनी शनिवारी 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 39 रुपयांनी वाढले आहेत.  मात्र, कंपन्यांनी 14 किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाहीये. त्यामुळं सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत 19 किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1644  रुपयांना मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन दरांनुसार, आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आजपासून 19 किलोंच्या गॅस सिलिंडरची किंमत 1691.50 रुपये इतकी झाली आहे. IOCLच्या वेबसाइटनुसार, कमर्शियल गॅस सिलिंडरचे नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1644 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी मुंबईत याच सिलिंडरची किंमत 1605 रुपये इतकी होती. 


ऑगस्टमध्येही वाढवले होते दर 


ऑगस्टमध्येही तेल कंपन्यांनी 8.50 रुपयांनी दर वाढवले होते. मात्र आता थेट 39 रुपयांनी दरांत वाढ केली आहे. यापूर्वी जुलैमध्ये कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांची घट केली होती. त्यानंतर दिल्लीत या गॅस सिलिंडरची किंमत 1646 रुपये इतकी झाली होती. तर, मुंबईत 1598 रुपयांची घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा 39 रुपयांची वाढ झाली आहे. 


मुंबई-कोलकाता येथे किती आहे किंमत?


इंडियन ऑइल कंपनी (IOCL) च्या वेबसाइटनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून दरवाढ लागू झाली आहे. त्यानंतर मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1644 रुपये झाली आहे. यापूर्वी मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1605 रुपये होती.


तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये हे सिलिंडर आता 1855 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 1817 रुपये होती.