नवी दिल्ली : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने १ लाख रुपयांवरून १ लाख ६० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर याबाबत तशी घोषणा केली. ते आज रिझर्व्ह बँकेच्या सहाव्या द्वैमासिक पतधोरणाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत बोलत होते. या निर्णयामुळे छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना हा पत पुरवठा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दिल्लीत लागू होणार स्वामीनाथन आयोग


२०१० मध्ये शेतकऱ्यांसांठी तारणमुक्त कर्ज देण्याची मर्यादा १ लाख रुपये निश्चित केली होती. ही वाढवण्याची बँकेनं स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीनं शिफारस केली होती. त्याआधारेच मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच महागाई नियंत्रणात राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.