रिझर्व्ह बँक आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास काही थोड्यावेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास काही थोड्यावेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. देशासमोर उद्भवणाऱ्या आर्थिक संकटाविषयी काय पावलं उचलली जातील याची माहिती ते या पत्रकार परिषदेत देतील अशी अपेक्षा आहे. याआधी पहिलं लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची तातडीची बैठक बोलावून व्याजाच्या दरात .७५ टक्के कपात जाहीर केली होती.
त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते तीन महिन्यांकरता स्थगित करण्याची परवानगी सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना देण्यात आली होती. आजच्या भाषणात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेमक्या काय काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची देशातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत कालच एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शक्तीकांता दास नेमक्या काय काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.