नवी दिल्ली : गृहमंत्रालयानं मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये लावण्यात आलेल्या बंदीबद्दल महत्त्वाची सूचना जाहीर केलीय. जम्मू-काश्मीरमध्ये टप्याटप्यानं बंदी हटवण्यात येईल. गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मूल्यांकडनानंतरच याबद्दल निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही अडथळ्याविना मेडिकल सुविधा इथल्या नागरिकांना पुरवण्यात येत आहेत. वेगवेगळ्या ओपीडीमध्ये १३५० रुग्णांवर उपचार देण्यात आले. खोऱ्यातल्या सर्वच रुग्णालयांत सर्व आवश्यक औषधं उपलब्ध असतील हे सुनिश्चित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर सामान्य रुपात वाहनांची ये-जा सुरू आहे. एलपीजी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची वाहतूक करणारी १०० वाहनं दररोज इथून प्रवास करत आहेत. स्वातंत्र्यदिनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये फुल ड्रेस रिहर्सल सुरू आहे.