Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला; पत्नीने कंपनीवर ठोकला दावा
Google Map वर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. Google Map ने दाखवलेला रस्ता एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.
Google Map : प्रवास देखील आता हायटेक झाला आहे. प्रवासादरम्याम वाट दाखवणारा कुणी नसला तरी मोबाईल तुम्हाला रस्ता दाखवतो. मोबाईलमध्ये असलेल्या Google Map च्या मदतीने पाहिजे त्या ठिकाणी पोहचता येवू शकतो. Google Map मोबाईलच्या मदतीने रस्ता दाखवतो. मात्र, याच Google Map मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या पत्नीने Google Map कंपनीविरोधात दावा ठोकला आहे.
अमेरिकेत ही विचित्र घटना घडली आहे. फिलिप पॅक्सन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. Google Map ने दाखवलेल्या रस्त्यावरुन फिलिप प्रवास करत होता. मात्र, यावेळी त्याची कार तुटलेल्या पुलावर गेली आणि थेट 20 फूट खोल खाली कोसळली. फिलिप हा आपल्या कुटुंबासह अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहत होता. फिलिप याच्या कुटुंबियांनी Google Map कंपनी विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडल?
30 सप्टेंबर 2022 फिलिप पॅक्सन याचे कार अपघातात निधन झाले. ज्या पुलावरुन कार कोसळून फिलिप याचा अपघात झाला तो पुल प्रत्यक्षात तुटलेला होता. फिलिप याच मार्गावरुन प्रवास करत होता. प्रवासादरम्यान फिलिप याने मोबाईवर Google Map ऑन केला होता. Google Map नुसार तो प्रवास करत होता मात्र, हाच प्रवास त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला.
Google Map ने नेव्हिगेशन सिस्टिम अपडेट ने केल्याचा कुटुंबियांचा आरोप
ज्या पुलावरुन फिलिप याची कार कोसळली तो पुल नऊ वर्षांपूर्वी तुटलेला होता. या पुलावरुन प्रवास करु नये अशी सूचना स्थानिक देत होते. स्थानिक प्रशासनाने Google Map कंपनीला देखील या पुलाबाबकती माहिती दिली होती. मात्र, Google Map ने नेव्हिगेशन सिस्टिम अपडेट केली नव्हती. यामुळे फिलिप याने आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी Google Map लावला तेव्हा Google Map वर फिलिप याचा हाच मार्ग सुचवण्यात आला. मात्र, हा प्रत्यक्षात मृत्यूचा मार्ग असल्याची कल्पना फिलीप याला नव्हती. या तुटलेल्या पुलावर प्रवाशांनी जाऊ नये अशा कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा कोणही सुरक्षा रक्षक येथे तैनात नव्हता. यामुशे पुढे धोका असू शकतो याबाबत कोणताच अंदाज फिलिप याला आला नाही. तुटलेल्या पुलावरुन प्रवास करत असताना त्याची कार 20 फूट खोल खाली कोसळली.
Google Map कंपनीविरोधात कोर्टात खटला
फिलिप याच्या कुटुंबियांनी Google Map कंपनीविरोधात वेक काउंटी सुपीरियर कोर्टात खटला दाखल केला आहे. कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका फिलिप याच्या कुटुंबियांनी ठेवला आहे.