मुंबई : काही दिवसांपूर्वीच दक्षिणातील स्ट्रगलर अभिनेत्री श्री रेड्डीने टॉलिवूड सिनेमाच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केल होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचमुळे वैतागलेली श्रीरेड्डीने न्यूड होत विरोध दर्शवला होता. श्री रेड्डीने प्रश्न उपस्थित केला आहे की, का मुलींना इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. तिने म्हटलं की आम्ही सेक्स डॉल नाही आहोत. आम्ही येथे काम करण्यासाठी येतो. जेव्हा तिला विचारण्यात आलं की, तुला देखील या परिस्थितीतून जावं लागलं का? तर तिने म्हटलं हो मी देखील एक पीडित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री रेड्डीने म्हटलं की निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी तिचं यौन शोषण केलं. तिच्याकडे याचे पुरावे देखील आहेत. श्री रेड्डीने पुढे म्हटलं की, निर्माते आणि दिग्दर्शकांनी इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष दाखऊन तिचे न्यूड फोटो काढले आणि व्हिडिओ देखील बनवला. श्री रेड्डीने म्हटलं की, यौन शोषण झाल्यानंतर ही मला काम नाही मिळालं.


या प्रकरणात तेलुगू मूवीज आर्टिस्ट एसोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी राजा यांनी प्रतिक्रिया दिली की, 'ते श्री रेड्डीच्या आरोपांवरुन खूप दु:खी आहे. आम्ही नेहमी लोकांची मदत करतो. आम्ही अनेक महिलांची मदत केली आहे. ज्यांच्या विरोधात आरोप झाले त्यांच्य़ावर कारवाई देखील केली. श्री रेड्डीसोबत बोलतांना म्हटलं होतं की तिने यावं आणि तिची तक्रार मांडावी. पण ती सोशल मीडियावर हेली आणि जे काही केलं ते फक्त तिने प्रसिद्धीसाठी केलं.'